Posts

तेथे लव्हाळी वाचती?

Image
बालसाहित्य विशेषांक, रेषेवरची अक्षरे प्रकाशन : ३० सप्टेंबर २०१७ अनुक्रमणिका संपादकीय विशेष प्रश्नांचं मोहोळ - आदूबाळ (सर्वेक्षणाचा निकाल आणि निरीक्षणं) वाचन... मोठम्... खोटम्... - प्रणव सखदेव (कथा) एका पिढीची वाचनदास्तान अर्धा फूट ते ७२ फूट आणि मध्ये आपण! - श्रीकांत बोजेवार आठवणीतलं पुस्तक - ज्युनिअर ब्रह्मे एका पुस्तकाचा शोध आणि बोध - पंकज भोसले खुणेची पानं - राजीव काळे गावाकडची वाचनसंस्कृती म्हणतात, त्याची वैयक्तिक गोष्ट...- रवि आमले देनिसची गोष्ट - स्नेहल नागोरी बुकवर्म - गणेश मतकरी मुलाखत अशक्त अर्थव्यवस्थेची लुकडी फळे - चंद्रमोहन कुलकर्णी (आदूबाळ) आम्ही एकटे कुठवर पुरे पडणार? - रत्नाकर मतकरी (रेवती असेरकर) खारीच्या वाटा आणि खारीचा वाटा - ल. म. कडू (तिर्री‌) गप्पा माधुरी पुरंदरेंशी - माधुरी पुरंदरे (पंकज भोसले) प्रयोगांतून बहरत गेलेला 'किशोर' - ज्ञानदा नाईक (प्रसाद फाटक) पाठ्यपुस्तकांच्या दुनियेत अभ्यासाला 'लावलेल्या' कविता - गायत्री नातू एका पाठ्यपुस्तकाचा जन्म - सायली गानू मुलांची मासिकं ...

बदलतं मराठी बालसाहित्य

'बदलतं मराठी बालसाहित्य' या विषयाला वाहिलेला एक विशेषांक घेऊन ‘रेषेवरची अक्षरे’ लवकरच येत आहे. या अंकात विविध मान्यवर नि जाणकार यांच्या मुलाखती, लेख यांतून गेल्या काही दशकांत बालसाहित्यात झालेल्या विविध बदलांचा मागोवा घेतला जाणार आहे.  यासंदर्भात आजच्या मराठी बाल/कुमार पिढीच्या वाचनसवयी काय आहेत हे टिपण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही पिढी काय वाचते, कसं वाचते, का वाचते, कोणत्या भाषेतलं साहित्य वाचते वगैरे. या पिढीच्या वाचनसवयींची तुलना त्यांच्या पालकांच्या पिढीशी केली तर साधारण पन्नासेक वर्षांचं चित्र एकत्र पाहता येईल, आणि या काळात झालेले बदलही टिपता येतील. यासाठी आम्ही दोन सर्वेक्षणं करत आहोत. किंबहुना एकाच सर्वेक्षणाचे हे दोन भाग आहेत. साधारण वाचत्या वयात असलेल्या मुलामुलींनी (वय वर्षे सात ते अठरा) भरायची एक प्रश्नावली आहे. जवळजवळ तशीच, पण थोडं वेगळेपण असलेली प्रश्नावली त्यांच्या पालकांनी भरायची आहे. खाली या प्रश्नावल्यांचे दुवे दिले आहेत. जर तुम्ही सात ते अठरा या वयोगटातल्या मुलामुलींचे पालक असाल, तर ही प्रश्नावली स्वत: भरा आणि आपल्या पाल्याकडून...

वाचनीय दिवाळी अंक - लोकमत दीपोत्सव

Image
- अंतरा आनंद बॅग उचलून वाट फुटेल तिथे जाणार्‍या बॅगपॅकर्सपासून ते प्रवास म्हणजे खान-पान आणि आराम असं समीकरण मांडणार्‍या प्रवासी कंपन्यांसह प्रवास करणारे प्रवासी, असे अनेक प्रकार प्रवासाचे आणि प्रवाशांचेही. पण प्रत्येक जण स्वत:च्या नकळत प्रवास करतच असतो. लहानपणीच्या बोबड्या बोलांपासून ते बोळक्या तोंडातून निघणार्‍या बोलांपर्यंतच्या प्रत्येकाच्या प्रवासात अनंत प्रवास सामावलेले असतात. अशा प्रवासांचं वेगळेपण टिपणारा दिवाळी अंक म्हणजे लोकमतचा 'दीपोत्सव'. मोटार, रेल्वे, विमान या सर्वांहून भारी असं प्रवासाचं साधन म्हणजे सायकल. या सायकलीचं चित्र असलेलं अंकाचं मुखपृष्ठ लक्ष्यवेधी आहे. दिवाळी म्हणून की काय, या सायकलला झालर लावलीय. तोरणासाठी पानं-फुलं घेऊन चाललेल्या या सायकलच्या कॅरिअरवर फटाक्यांच्या पेट्या तर आहेतच, पण मागे छत्रीही लावलीय. दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाची पठडी मोडणारं असं हे मुखपृष्ठ. आपला अंकाबरोबरचा प्रवास तिथूनच सुरू होतो. लोकमतच्या पत्रकार चमूने एनएच-44 या महामार्गावरून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत केलेला प्रवासावर आधारित 'एनएच 44' हा लेख हा या अं...

समकालीन आणि सखोल - युगांतर

Image
- मेघना भुस्कुटे आपण एखाद्या विचारसरणीच्या बाजूचे असलो, की त्या विचारसरणीला अनुकूल अशा लेखनाचं मूल्यमापन करताना आपण पुरते तटस्थ असत नाही. तर या मर्यादेचं काय करायचं, असा एक पेच मला 'साप्ताहिक युगांतर'च्या दिवाळी अंकाबद्दल लिहिताना पडला आहे. पण समकालीन गोष्टींना प्रतिसाद देण्याच्या बाबतीत आणि लेखनशैलीच्या बाबतीत इतकं वैविध्य, दर्जा आणि तातडी जपणारा एकसंध अंक हाती आलेला असताना त्याबद्दल लिहिणं अत्यावश्यकच आहे. तटस्थपणा कुठवर ताणायचा, असा एक प्रश्न माझा मलाच विचारून मी अंकाबद्दल बोलणार आहे. व्याप्तिनिर्देश (disclaimer) संपला. एक कोणतंतरी सूत्र घेऊन त्यावर विशेषांक काढण्याची टूम सध्या दिवाळी अंकांमध्ये लोकप्रिय आहे. अशा प्रकारची कोणतीही घोषणा न करता, 'साप्ताहिक युगांतर'चा अंक एका विशिष्ट सूत्राभोवती नैसर्गिकपणे उगवून आल्यासारखा भासतो. जगाला विनाशाकडे लोटणारं आजच्या भांडवलशाहीचं प्रारूप आणि त्यामुळे बदलतं जग, हे ते सूत्र आहे. अनेक अभ्यासपूर्ण आणि समयोचित लेख, ललित लेख, कथा आणि विशेषतः कविता यांमधून हे सूत्र कधी पार्श्वभूमीला, तर कधी पुरोभूमीला; मूकपणे उभं असल्य...

डिजिटल दिवाळी : आकाराने मोठा आणि रूपाने सुबक अंक

Image
- ऋषिकेश तुम्ही कधी, रांगोळ्या-बिंगोळ्या घालून, लय भारी वातावरण तयार करून, चांदीच्या ताटात भरपूर वाट्या असणारी 'थाली' लोकांना खिलवणार्‍या काही हॉटेलांत गेलायत का? तिथलं वातावरण, आसनव्यवस्था, अदबशीर वेटर्स, मंद संगीत, अतिशय सुरेख पद्धतीनं भरलेलं 'देखणं' ताट यांमुळे तुम्हांला सपाटून भूक लागते का? अशी भूक लागल्यावर पहिल्याच घासात खडा लागला, आणि मग एकापेक्षा एक छान नावं असलेल्या प्रत्येक वाटीतला पदार्थ खाताना - एखादीत गुंतवळ, तर दुसरीतल्या पदार्थात मीठ कमी, एका वाटीतल्या पदार्थात नुसताच मसाला, तर दुसरीतली भाजी पोटात कच्ची - अश्या निरनिराळ्या बाबी खटकायला लागल्या तर? नि शेवटी बाहेर पडताना पोट भरलं तर खरं, पण तोंडाला चव अशी आली नाहीच; उलट अती गोग्गोडपणानं एक प्रकारचा चिकटाच आला, तर तुम्ही काय म्हणाल? मला नेमकं तेच 'डिजिटल दिवाळी' या दिवाळी अंकाबद्दल म्हणायचंय! खाणं हा जगाला एकत्र आणणारा विषय. त्यावर सर्वच भाषांतून सतत आणि ढीगभर लिहिलं, बोललं, वाचलं आणि म्हटलं जात असतं. नि तरीही समाधान होत नाही. सगळ्यांनाच त्यावर आणखी काहीतरी म्हणायचं असतंच. मराठी आंतरज...