Posts

Showing posts with the label मायबोली

तिरंगा

Image
- फारएण्ड कलाकारांची ओळखः हीरो लोकः हीरो-१: नाना- सतत वैतागलेला. उसूल "पहले लात (लाथ), फिर मुलाकात, फिर बात." हीरो-२: राजकुमार - चेहरा व मिशी यांच्या अलाइनमेंटमध्ये पृथ्वीच्या अक्षासारखा फरक. मेकअप टीमने डोळ्यावर पट्टी बांधून त्याच्या चेहर्‍यावर मिशी लावण्याचा खेळ खेळलेला केलेला आहे (चित्रातील गाढवाला शेपटी लावतात तसे), असे सतत वाटणारा. उसूल "पहले मुलाकात, फिर बात, फिर जरूरत पडे तो लात." हीरॉइन्स - हरीश, ममता,कुलकर्णी आणि वर्षा उसगावकर. ("इसे समझो ना रेशम का तार भैय्या") चरित्र इ. अभिनेते - आलोक नाथ व सुरेश ओबेरॉय तर व्हिलन्सः दीपक शिर्के ("जंग के मैदान मे कोई भी परमवीर चक्र चटकही लेता है, लेकिन मेरी तलवार की धार के आगे..."), मनोहर सिंग, बॉब क्रिस्टो व इतर अनेक वाईट लोक. हरीश व ममता कु. यांचे एक रोमँटिक गाणे. आधी मला वाटले दोन मैत्रिणींची गाणी असतात, "सुन री ओ सहेली, तू चंपा मै चमेली" तसे काहीतरी असेल. पण हे खरे डुएट निघाले. यात एकाच गाण्यात ते सुमारे २५ ड्रेस बदलतात (म्हणजे तेवढे ड्रेस दिसतात....