Posts

Showing posts with the label ललित

ट्रोजन युद्ध : अकीऽऽलिस! अकीऽऽलिस!! अकीऽऽलिस!!!

Image
- निखिल बेल्लारीकर पॅट्रोक्लसच्या प्रेताभोवती तुंबळ कापाकापी होते. मागच्या भागात अकिलीसचा भाऊ पॅट्रोक्लस हेक्टरच्या हातून मरण पावला, त्याचा वृत्तांत आलेला आहे. तो मेल्यावर माशा घोंगावाव्यात तसे त्याच्या प्रेताभोवती ट्रोजन घोंगावू लागले. उद्देश अर्थातच त्याचे चिलखत काढून घेणे, हा होता. संपूर्ण इलियड आणि एकूणच ट्रोजन युद्धात अशा प्रकारचे प्रसंग खूपदा आलेले आहेत आणि त्यांतून कथानकाला अनपेक्षित कलाटणीही मिळालेली आहे. तर त्याच्या प्रेताभोवती पहिल्यांदा आला मेनेलॉस - त्याची डेड बॉडी ग्रीक बाजूला परत न्यावी म्हणून. तोवर युफोर्बस नामक एक ट्रोजन योद्धा आला आणि ‘किरातार्जुनीया’तल्याप्रमाणे दोघांची बाचाबाची सुरू झाली. शेवटी मेनेलॉसने त्याच्या अंगात भाला खुपसून या वादाचा कंडका पाडला आणि त्याच्या अंगावरील चिलखत काढून घेतले. इकडे हेक्टरला मेन्तेस नामक एका सेनापतीने ओरडून पुनः युद्धासाठी प्रेरित केल्यावर हेक्टर सेना घेऊन तिथे आला. मेनेलॉस एकटाच पडल्याने मागे हटला, इतके लोक काही त्याच्याने आवरेनात. तोपर्यंत हेक्टरने पॅट्रोक्लसच्या शरीरावरील चिलखत काढून स्वतः घातले होते, कारण ते अकिलीसचे चिल...

आन्सर क्या चाहिये? : अ‍ॅडमिशन वगैरे

- अस्वल रिझल्ट लागल्यावर मी बारावीचं मढं पुरलं एकदाचं. एवढी कडवट चव बाकी कधीच कुठल्या वर्षाने मागे ठेवली नव्हती. अख्खं वर्ष पीसीएम ह्या शब्दांतच गेलं. मि़ळाले २८९/३००. आई-बाबा खूश. बारावीचा एवढा राग यायचं अजून एक कारण आहे. विषय मस्त होते, ह्या दळभद्र्या वर्षाने ते नीट एंजॉयपण करू दिले नाहीत. Conics, Derivatives, Integration ह्या कसल्या अफलातून कन्सेप्ट्स आहेत. आरामात जर चहाच्या घोटाबरोबर एखाद्या वेळी ही गणितं सोडवली, तर पटकन सुटतात. मजा येते. पण इथे कोणी मस्तपैकी वेळ घेत, असं करायलाच देत नाहीये. क्रिकेट खेळताना जर फक्त जिंकायचंय म्हणून खेळलं, तर मग क्रिकेटची काय मजा? एखादा फसलेला शॉट, हुकलेला कॅच आणि मग जमलेला यॉर्कर, ह्या लयीत मजा आहे. जाऊ दे. झालं-गेलं इन्फिनिटीला मिळालं... परत मी काही मोठ्या लोकांसारखा नाही. हे म्हणजे साले लहानपणीच आत्मचरित्रातले नायक-नायिका होऊन बसतात. शाळेतल्या सुजीतला पाचवीतच माहिती होतं म्हणे की त्याला डॉक्टर व्हायचंय म्हणून. गल्लीतल्या वासंतीने नववीत एअर होस्टेस व्हायचं स्वप्न बघितलं आणि ती ऑलरेडी सेट आहे. आपलं तसलं काही नाही- एक साधारण अंदाज आला की विज...

तीन विश्वनाथ

Image
- बघ्या यांतला पहिला तर तुम्हाला माहितीच आहे. मी त्याच्याबद्दल आधी लिहिलंय पण. तो आहे ‘रारंग ढांग’ मधला विश्वनाथ मेहेंदळे. दुसरा आहे मिलिंद बोकिलांच्या ‘अधिष्ठान’ कथेमधला विश्वनाथ. तिसरा आहे पानवलकरांच्या ‘परदुःख शीतल’ कथेतला विश्वनाथ. तिघेही थोडे जगावेगळे आहेत. मी या तिघांच्या गोष्टी वाचल्या त्या वेळा वेगवेगळ्या आहेत. ‘रारंग ढांग’च्या विश्वनाथबद्दल फार लिहायला नको. ती कादंबरी, त्यातला मूल्यांचा झगडा, माणसांचे स्वभाव, निसर्ग हे सगळं तसं लोकप्रिय आहे. दुसरा विश्वनाथ आहे तो बोकिलांच्या ‘झेन गार्डन’ कथासंग्रहातल्या ‘अधिष्ठान’ कथेत. मी जेव्हा ती गोष्ट वाचली, त्या वेळच्या माझ्या मन:स्थिती आणि परिस्थितीमुळे म्हणा, मला ती गोष्ट आवडली. पहिल्या विश्वनाथसारखा हा दुसराही तेज आहे. फरक एवढाच की मेहेंदळे सारा रोमान्स पत्रांतून करायचे. ह्या दुसऱ्या विश्वनाथचं लग्न झालंय, आणि त्यानंतर बायकोला सोडून तो पुढच्या शिक्षणाला अमेरिकेत का परदेशात गेलाय. तिसरा विश्वनाथ आहे तो नैतिकतेच्या बाबतीत पहिल्या दोघांच्याही खाली आहे. त्याचं लग्न झालंय, त्याचे अजून एका स्त्रीशी सबंध आहेत आणि त्याची नोकरीही...