३१ दिवस... no pain...
५.५५च्या गजराच्या १०-१५ मिनिटं आधीच डोळे उघडतात. रुममधे wireless सिग्नल येत नाही, म्हणून मी ground floorच्या loungeमधे लॅपटॉप घेऊन बसतो. "इतक्या सकाळी कसा ऑनलाईन?" असं एक मैत्रीण विचारते. "काम" हे माझं नेहमीचं उत्तर. गेस्ट-हाऊसमधला नंदू रोजचा, एक चमचा साखर आणि आलं घातलेला चहा, आणून देतो. तेवढ्यात रवींद्र येतो. "केतन, थोडा बाहर लॉन पर जाके देखो. कितना बढिया हैं..." पगडीशिवाय सकाळी-सकाळी रवींद्र वेगळाच भासतो. गेस्ट-हाऊसमधेच नुकतीच ओळख झालेली आमची. आयुष्यात मोजून १५-२० मिनिटांपेक्षा जास्ती कधी बोललो नाही आम्ही. पण सरदार लोकं चटकन मैत्री करणारे. त्याच्या सहकाऱ्याशी ओळख करून देताना म्हणाला, "अजय, इनसे मिलो. यह हैं केतन. हमारे परम मित्र..." पुढे मी सध्या काय काम करत आहे, इत्यादी, इत्यादी. रवींद्रनी खूप जोर दिला, म्हणून बाहेर लॉनवर गेलो. सकाळच्या ६.४५-७ वाजताची वेळ. थोडंसं ढगाळ वातावरण. आकाशात पाखरांचा एक थवा एका मस्त rhythmमधे उडत होता. दोन बंगल्यांच्या मधल्या बोगनवेलावर चिमण्या खेळत होत्या. समोरच्या घराच्या कौलांवर दोन कबुतरं सकाळच्या गप्पा मारत बसली ...