जिवाजवळच्या गोष्टीची वाटणी
भेटशील तेव्हा दिसतील तुझे़ किलकिले डोळे
पापणीवरून धावणारं,
डोळ्यांत न मावणारं
लुटूलुटू स्वप्न : त्याच्या खोड्या, त्याचे चाळे.
बघतील आणि हसतील माझ्या डोळ्यांच्या बाहुल्या
स्वप्नाचा़ ठाव सुटेल,
धुबुक् पडून परत उठेल
बाहुल्यांवर झेप घेईल मुठी नाचवत इवल्या.
अस्सं तुझ़ं स्वप्न जर कधी आपलं झालं
मोठ्ठं / खरं / खोटं होत एके दिवशी उडून गेलं
तर तुला चा़लेल?
तरच, भेटूच.
- गायत्री
(http://bolaacheekadhee.blogspot.com/2010_05_01_archive.html)
Comments