रेषेवरची अक्षरे २०११
'रेषेवरची अक्षरे २०११'ची पीडीएफ आवृत्ती तुम्ही इथून उतरवून घेऊ शकता.
***
तुतारीच्या शोधात...
सालाबादप्रमाणे 'रेषेवरची अक्षरे'चा अंक ह्याही दिवाळीला आपल्यासमोर हजर आहे. मागल्या वर्षात काय झालं? काही ब्लॉग आले, काही ब्लॉग गेले. काही तरले, काही बुडाले.काही मंदावले. काही सुस्तावले.काही दौडले. काही सुटलेच. काही आपले चालले नि काही दुसर्यांनीच चालवायला घेतले! त्यांना आपण शुभेच्छा देऊ. चालणार्यांना प्रोत्साहन देऊ.सुटलेच आहेत त्यांना सोडून देऊ. दौडणार्यांना दौडू देऊ.सुस्तावल्यांना गदगदा हलवू. मंदावल्यांना दमदाटी करून लिहितं करू. बुडलेल्यांना तरलेल्यांनी वंदन करावे. आलेल्यांनी गेलेल्यांच्या रिकाम्या जागा भराव्यात. हे सगळं झालं की कशी ब्लॉगविश्वाची अनुदिनी मागल्या पानावरून पुढे चालू. काही नवं नाही नि काही जुनंही नाही. पण आम्ही एक तुतारी शोधत राहणार. जमेल तसं नवं शोधत राहणार, करत राहणार नि तुम्हांला सारखं तसं सांगत राहणार.
अनुक्रमणिका
संकलित विभाग
०३. शब्द - राज
१०. वैती - संवेद
१३. वाटा - ए सेन मॅन


Comments